ऐश्वर्यापेक्षा अभिषेक अभिनयात उजवा !
यातील अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या बऱ्याच बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. यावर अद्याप ऐश्वर्या व अभिषेक यांनी कोणतेही वक्तव्य केले नसले तरी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून या बातम्या किती खोट्या आहेत हे सिद्ध केले आहे. आता अभिषेकची बहीण श्वेता बच्चनचे एक जुने वक्तव्य समोर येत आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अभिषेकने अभिनयात नशीब आजमावले अन् स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा श्वेता बच्चनचा व्हीडीओ हा तसा जुना आहे. २०१९ साली प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅटशोवर श्वेता आणि अभिषेक यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी रॅपिड फायर राऊंडदरम्यान करणने श्वेताला एक फारच अडचणीचा प्रश्न विचारला अन् श्वेताने तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. करण जोहरने त्यावेळी प्रश्न विचारला, “तुझ्या मते सर्वात उत्तम अभिनेता कोण? अभिषेक की ऐश्वर्या?” तेव्हा जराही विलंब न करता या प्रश्नाचं उत्तर श्वेताने दिले ते म्हणजे अभिषेक बच्चन हे नाव. सोशल मीडियावर सध्या हा व्हीडीओ चांगलाच चर्चेत असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी खरेच अभिषेक हा ऐश्वर्यापेक्षा उत्तम नट असल्याचे कबूल केले आहे, तर काहींनी या वक्तव्यावरून श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनाच ट्रोल केले आहे. अभिषेक बच्चन नुकताच ‘घुमर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला तर ऐश्वर्या राय बच्चन ही नुकतीच मणीरत्नम यांच्या ‘पीएस १’ आणि पीएस २’मध्ये झळकली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.