प्रियांका चोप्रा साठी ठरला "परफेक्ट मोमेंट"
परफेक्ट मोमेंट या 2022 पासून लक्झरी आउटडोअर क्लॉथिंग कंपनीचे भागधारक असलेल्या प्रियांका चोप्रा जोनास आणि निक जोनास यांनी या ब्रँड चा प्रवास जवळून पाहिला आहे या ब्रँड ने म्हणजे "परफेक्ट मोमेंटने " गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये दमदार पदार्पण केल आहे. कंपनीच्या प्रगतीबद्दल त्यांचा उत्साह आणि अभिमान या दोघांनी शेअर केला आहे.
प्रियांका आणि निकसाठी परफेक्ट मोमेंट सोबतची त्यांची भागीदारी केवळ आर्थिक फायद्याची ठरली पण सोबतीने या ब्रँड ने खूप प्रशंसा मिळवली आहे.
परफेक्ट मोमेंट सार्वजनिक बाजारपेठेत प्रवेश करत असताना प्रियांका आणि निक यांनी ब्रँडच्या भविष्याची अपेक्षा केली. या परिवर्तनाच्या टप्प्यात कंपनीच्या प्रवासाचा भाग असल्याचा त्यांचा अभिमान आणि त्यांच्या सततच्या यशावर त्यांचा विश्वास आहे. एका इव्हेंट दरम्यान या जोडप्याने परफेक्ट मोमेंटच्या IPO बद्दलचा त्यांचा उत्साह शेअर करत असे म्हटले आहे की " हा IPO परफेक्ट मोमेंटसाठी एका रोमांचक नवीन प्रवास असणार आहे. प्रवासाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यात आम्ही या कुटुंबाचा भाग असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ब्रँडबद्दलची प्रशंसा गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे. हा ब्रँड शेअरहोल्डर्समध्ये प्रशंसक बनला आहे आणि याचं सेलिब्रेशन आम्ही करत आहोत"
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.