संग्रहित छायाचित्र
पुढील तीन-चार दिवसांसाठी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट (Yellow Alert) जाहीर केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसा पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे. (Yellow Alert in Maharashtra)