लक्ष्मण हाकेंची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी

महायुतीच्या या विजयानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. तसेच महायुती सरकारकडे त्यांनी मंत्रिपदाचीही मागणी केली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

निवडणूक निकाल ही जरांगे यांना चपराक, आम्ही सभा घेतल्या म्हणून महायुतीला यश

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडीची अक्षरश: धुळधाण झाली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पॅटर्न फ्लॉप ठरल्याने आणि ओबीसी एकवटल्याने मविआला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. महायुतीच्या या विजयानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. तसेच महायुती सरकारकडे त्यांनी मंत्रिपदाचीही मागणी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांना लोक कंटाळले आहेत. त्यांनी १३० जागा पाडायची भाषणे केली, जिथे मेसेज दिला तिथे लोक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जरांगे खोटे बोलत आहेत. मी जिथे सभा घेतल्या तिकडे चांगली उमेदवारांना मते पडली आहेत. आता मनोज जरांगेंवर ही शेवटची पत्रकार परिषद घेत आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.  खुळचट बावळट जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेला पाडले, लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगे यांना चपराक आहे, आम्ही ओबीसीला जवळ म्हणणारी माणसे आहेत. मी जाहीर भूमिका घेतली होती महायुतीची सुपारी. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा ते म्हणत होते मी जरांगेमुळे निवडून आलो. मला विधान परिषद काय कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा केंद्रीय मंत्रिपद काहीतरी  द्यायला हवे. मी अर्ध्या समाजाचे प्रतिनिधित्व करतोय. अशी सर्वात मोठी मागणीही त्यांनी केली आहे.

राजेश टोपे लबाड माणूस
राजेश टोपे नावाचा लबाड माणूस पडला याचा मला आनंद आहे. रोहित पवारचेही आम्ही कान कापलेत. आम्ही उघडपणे महायुतीचे काम केले. आता कोणीही मुख्यमंत्री व्हावे, आम्ही आमचे काम केले आहे. मी महायुतीची जाहीर भूमिका घेतली. जरांगेंनीही शरद पवार यांची भूमिका घेतली होती. मी जिथे सभा घेतल्या तिथे भरभरून मते मिळालीत, अशी टीका करत द्यायचे असेल तर कॅबिनेट मंत्रिपद द्या, विधान परिषद वगेरे नको, ओबीसी चळवळीला चिल्लर समजू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest