अंधेरीतील सहा मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईमधील अंधेरी भागातील वीरा देसाई रोडवर असलेल्या सहा मजली निवासी इमारतीला आज ( दि.२७) सकाळच्या वेळेत भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी नऊच्या सुमारास इमारतीतील एका घरात आग लागली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 27 Nov 2024
  • 07:25 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

थरारक घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईमधील अंधेरी भागातील वीरा देसाई रोडवर असलेल्या सहा मजली निवासी इमारतीला आज ( दि.२७) सकाळच्या वेळेत भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी नऊच्या सुमारास इमारतीतील एका घरात आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) येथील चिंचन बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये सकाळी पावणे नऊच्या सुमारास आग लागली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की सकाळी ९ च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली आणि घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने इमारतीमधील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढणयात यश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही मोठी वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना आग वाढताना दिसत होती. इमारत पूर्णपणे खाली करण्यात आली. मात्र, ही इतकी मोठी आग नेमकी कशाने लागली, याबद्दल अजून माहिती मिळू शकली नाही. आता या आग प्रकरणाचा तपास हा स्थानिक पोलिस प्रशासन आणि अग्नीशामक दलाकडून करण्यात येणार आहे.

यापूर्वी कल्याणमध्ये १६ व्या मजल्यावर लागली होती आग
नुकतेच २६ नोव्हेंबर रोजी कल्याणमधील आधारवाडी परिसरातील प्रसिद्ध व्हर्टेक्स हौसिंग सोसायटीमधील सतराव्या आणि अठराव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीतून मोठा धुराचा लोट निघाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest