आता देवेंद्रच मुख्यमंत्री व्हायला हवेत; आता त्यांच्यावर अन्याय नको, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा आग्रह

सोलापूर : पक्षाला, राज्याला गरज होती तेंव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यागाची भूमिका घेतली होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे मत माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

देवेंद्र फडणवीसांनी त्यागाची भूमिका घेतली

सोलापूर : पक्षाला, राज्याला गरज होती तेंव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यागाची भूमिका घेतली होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे मत माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. भाजप दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचा लोकमंगल बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

आमदार सुभाष देशमुख हे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७२ हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. आमदार सुभाष देशमुख हे लोकमंगल बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते असून त्यांनी यापूर्वी त्यागाची भूमिका घेतली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची अपेक्षा आहे. राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी, रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी यापूर्वी फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला. झुकते घेऊन उपमुख्यमंत्री स्वीकारले. मात्र राज्यात सलग तिसऱ्यांदा पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनवत यश मिळवून दिले आहे. परिस्थितीनुसार पक्षाच्या आदेशानुसार नमते घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच आता मुख्यमंत्रीपद मिळायला हवे, असा आमचा आग्रह आहे. पक्ष सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळे आम्ही पक्षादेश पाळणारी माणसे आहोत, मंत्रिपद दुय्यम आहे, असेही  देशमुख म्हणाले.

मराठा महासंघाची देवेंद्र फडणवीसांचा नावाला पसंती
तर दुसरीकडे मराठा महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती देत पाठींबा दिला आहे. जरांगे पाटलांचे आंदोलन व्यक्ती द्वेषाचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कधी जातीभेद केला नाही आणि २ टक्के लोक काय जातीभेद करणार? असा सवालही मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडे यांनी केला आहे. मराठा महासंघाने यंदा १२५ वर्षे पूर्ण केले आहेत. आण्णासाहेब पाटील महामंडळ मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना स्थापन केले. फडणवीस यांनीच मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या प्रस्थापित मराठा नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अफवा पसरवल्याचेही ते म्हणाले.

गणरायाला घातले साकडे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसच व्हावेत यासाठी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह अष्टविनायक गणपती मंदिरावर देवेंद्र फडणवीस यांच्या वजना एवढा प्रसाद अर्पण करण्याचे नवस घेऊन साकडे घातले आहेत. राज्यभरातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत, नवस, पूजा केली जात आहे. लवकरच मुख्यमंत्री पदाबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest