उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज
# मुंबई
उद्धव ठाकरेंची ‘नागपूरचा कलंक’ ही टीका जिव्हारी लागलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी (दि. ११) जोरदार पलटवार केला. ‘‘माझे माजी मित्र उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. त्यांची स्थिती आपण समजून घेतली पाहिजे,’’ असा टोला त्यांनी लगावला.
ठाकरे यांच्याबद्दल फडणवीस म्हणाले, ‘‘आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याच्या राजकारणाचा फारच विपरीत परिणाम झाला आहे. कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल की काय, अशी स्थिती आहे. या मानसिक स्थितीतून ते बोलत असतील, तर त्याच्यावर फार काही बोलणे योग्य ठरणार नाही. त्यांची स्थिती सर्वांनी समजून घेतली पाहिजे.’’
माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख कलंकीची कावीळ म्हणून केला होता.
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. १०) नागपुरातील कायकर्ता मेळाव्यात फडणवीस यांच्यावर जहाल टीका केली होती. त्यात त्यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ म्हणून केला होता. ‘‘ते आता उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ मध्ये शिवसेनेने नाही, तर तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो. तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे माझी नाही,’’ असे ठाकरे यांनी फडणवीसांना त्यांच्याच होम ग्राऊंडवर सुनावले होते. ही टीका झोंबल्याने भाजपने ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. ‘‘फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहेत.
वृत्तसंस्था