विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला फारस यश मिळालं नाही. अनेक ठिकाणी झालेला पराभव उद्धव ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे स्वतः आता आगामी महापालिका निवडणूकीसाठी मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी त्यांनी स्टॅस्टर्जीदेखील आखली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सादर केला. निरीक्षकांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे स्वतः जातीनं सर्वत्र लक्ष घालणार असल्याचे समजले आहे. तसेज जानेवारी महिन्यापासून उद्धव ठाकरे हे सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान त्यापूर्वी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थित 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू होणार आहे.
ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेबाबत समोर आली मोठी अपडेट; महिलांच्या खात्यात...
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबर पर्यत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळं उद्धव ठाकरे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरेंची जोरदार तयारी?
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढावी अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळं स्वतः जातीनं उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. घेण्यात येणाऱ्या बैठकांना विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.