Mahayuti Minister's Bungalow Allocation: महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप; बावनकुळेंना रामटेक, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला

मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्‍यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये, अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर, काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रि‍पदाची संधी मिळाल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 23 Dec 2024
  • 07:28 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप

मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्‍यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये, अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर, काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रि‍पदाची संधी मिळाल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्‍यांना  मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामध्ये, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याची चावी मिळाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. 

महायुतीच्या 31 मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडेंना सातपुडा, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आला आहे. दरम्यान, आधी मंत्रीपदावरुन, नंतर खातेवाटपावरुन काही नेत्यांमध्ये नराजाी पाहायला मिळाली. मात्र, आता बंगले वाटपावरुनही मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, गत बहुतांश मंत्र्यांना त्यांचेच बंगले अलोट करण्यात आल्याचं यादीवरुन दिसून येते. 

कोणत्या मंत्र्यांस कोणता बंगला

निवासस्थान राम शिंदे, सभापती, विधान परिषद - ज्ञानेश्वरी, राहुल नार्वेकर , अध्यक्ष विधानसभा - शिवगिरी, चंद्रशेखर बावनकुळे - रामटेक, राधाकृष्ण विखे-पाटील - रॉयलस्टोन, हसन मुश्रीफ (क-८) - विशाळगड,  चंद्रकांतदादा पाटील ब-१ सिंहगड,  गिरीश महाजन सेवासदन, गुलाबराव पाटील - जेतवन, गणेश नाईक ब-४ पावनगड ,  दादा भुसे ब-३ जंजीरा, संजय राठोड शिवनेरी, धनंजय मुंडे सातपुडा, मंगलप्रभात लोढा ब-५ विजयदुर्ग, उदय सामंत मुक्तागिरी, जयकुमार रावल चित्रकूट, पंकजा मुंडे पर्णकुटी, अतुल सावे अ-३ शिवगढ़, अशोक उईके अ-९ लोहगड, शंभूराजे देसाई मेघदूत, आशिष शेलार व-२ रत्नसिषु, दत्तात्रय भरणे ब-६ सिध्दगड, अदिती तटकरे अ-५ प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले ३-७ पन्हाळगड, माणिकराव कोकाटे अंबर-२७, जयकुमार गोरे क-६ प्रचितीगड, नरहरि झिरवाळ सुरुचि ०९, संजय सावकारे अंबर-३२, संजय शिरसाठ अंबर-३८, प्रताप सरनाईक अर्वतो-५, भरत गोगावले सुरुचि ०२, मकरंद पाटील सुरुचि-०३ देण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest