लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचे समजले आहे.
जुलै ते नोव्हेंबरपर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. आता आजपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, महिलांमध्ये संभ्रमतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येणारा हप्ता हा २१०० रुपये येणार की १५०० रुपये येणार अशी चर्चा महिलावर्गात सुरु झाली आहे.
२१०० रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार?
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना खात्यावर किती पैसे जमा होणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.