राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फडणवीस यांनी 5 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जुन्या भाषणांमध्ये छेडछाड करण्यात आली आहे आणि हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओमध्ये नक्की काय आहे?
सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केलेल्या भाषणाचा हा एक व्हिडीओ आहे तसेच हा व्हिडीओ अर्धवट एडीट करुन व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
भारत भावला शिंदे, शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल, सौरभ सिंह चौहान, मुकेश लवले, सुरेश काळे, प्रसाद साळवी, वरद कणकी, अमोल कांबळे, सय्यद सलीम, द स्मार्ट 230 के व विष्णू भोतकर अशी संशयित आरोपींची नाव असल्याचे समोर आलं आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.