संग्रहित छायाचित्र
आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका पत्राच्या माध्यमातून 'तुमचाही मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख करू' अशी धमकी देण्यात आली आहे. ढोकी पोलिसांत या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २२) रात्री गोपाळ प्रकाश आडे (रा. पुसद) हे ट्रॅक्टरमधून ऊस घेऊन तेरणा कारखान्याकडे जात होते. मुळेवाडी पाटीजवळ आले असता तोंडाला कपडा बांधून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. त्यांच्याकडे एक बंद पाकीट दिले. कारखान्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडून चेअरमन पर्यंत ते पाकीट पोहोचवण्यास त्यांना सांगण्यात आले. आडे यांनी ते बंद पाकीट सुरक्षारक्षक संजय निपाणीकर यांच्याकडे दिले. त्यांना ते पाकीट चेअरमनला देण्यास सांगितले.
मिळालेले पाकीट कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड यांनी उघडून वाचले. या पाकिटात १०० रुपये तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत व तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा मजकूर होता. दरम्यान, सुरक्षारक्षक संजय निपाणीकर यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही तपासून पूढील तपास करत आहे.
दरम्यान, धनंजय सावंत व केशव सावंत यांना अशा प्रकारे धमकीचे पत्र मिळाल्याच्या निषेधार्थ बुधवारी (२५) शिवसेनेच्या वतीने परांडा बंदची हाक देण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.