संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडील मोठा धक्का बसला. या निवडणुकीत सर्वांधिक फटका बसला तो म्हणजे काँग्रेस पक्षाला. त्यांना झालेला पराभव पचवणे जड गेल्याचे पाहायला मिळाले. मतांच्या टक्केवारीवरुन नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता निवडणुक आयोगाने त्यांच्या 50 जागांबाबतच्या प्रश्नांना 66 पानांचे उत्तर देत करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावलं आहेत. त्यामुळं आता नाना पटोले कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी निवडणुक आयोगाला प्रश्न उपस्थित केले होते. मतदान कमी असूनही जास्त दाखवले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, संध्याकाळी ६ वाजता मतदान झाल्यानंतर मतदानाचे चित्र काहिसे वेगळे असल्याचे सांगितले जाते आणि नंतर मतदान ४ ते ५ टक्क्यांनी वाढल्याचे दाखवले जाते. असंही काँग्रेसने पुरावा देत म्हटले होते. पण निवडणुक आयोगाने काँग्रेसचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
काँग्रेसला निवडणुक आयोगाचे उत्तर
५० विधानसभेच्या जागांवर जुलै ते नोव्हेंबर ५० हजार मतदार जोडण्याचा काँग्रेसने केलेल्या या आरोपामध्ये काही तथ्य नाही. प्रत्येक मतदारसंघाची माहिती तपासण्यात आली आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदारांची भर पडली, मात्र ती केवळ ६ विधानसभा मतदारसंघात वाढली असल्याचे निवडणुक आयोगाने म्हटलं आहे.
तसेच निवडणुक आयोगाने काँग्रेसच्या ओटर टर्नआऊटच्या दाव्यालाही उत्तर दिलं आहे. ओटर टर्नआऊटमध्ये बदल होणे अशक्य आहे. कारण उमेदवारांच्या एजंटकडे फॉर्म 17 सी असतो ज्यामध्ये मतदान संपल्यानंतर टक्केवारीचा आकडा नोंद केला जातो. काँग्रेसने हा आकडा तपासून बघावा असही निवडणुक आयोगाने म्हटलं आहे.
काँग्रेसचे आरोप नेमकं होते तरी काय?
काँग्रेसने निवडणुक आयोगाला 50 जागांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 50 हजार मतदार वाढल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तसेच, वोटर टर्नआऊट बदलले गेल्याचा आरोप करण्यात आला होता. मतदानात फेरफार केल्यामुळं राज्यातील 50 पैकी 47 मतदारसंघात महायुतीचा विजय झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र, निवडणुक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावलं आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.