दोन-तीन दिवस उष्णतेची लाट अन्, चार दिवस अवकाळी पाऊस

मार्च महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी विदर्भ, मराठवाड्यात लावल्यानंतर सध्या राज्यात तापमान वाढीला लागले. काही भागाचा अपवाद केला तर सारे राज्य वाढत्या तापमानाने पोळून निघत आहे.

Heat waves

दोन-तीन दिवस उष्णतेची लाट अन्, चार दिवस अवकाळी पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार एप्रिल-मे महिन्यांत कडक उन्हाळा

नागपूर : मार्च महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी विदर्भ, मराठवाड्यात लावल्यानंतर सध्या राज्यात तापमान वाढीला लागले. काही भागाचा अपवाद केला तर सारे राज्य वाढत्या तापमानाने पोळून निघत आहे. आता पुन्हा तापमान वाढत असून विदर्भात पारा ४२ अंश सेल्सिअस पलीकडे पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्याच्या अखेरीस चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र,  येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला आहे. (Heat waves)

विदर्भात तापमानाच्या पाऱ्यात वेगाने वाढ होत आहे. कमाल तापमानसह किमान तापमानातही वाढ झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तापमानाच्या पाऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस झाली. वर्धा, यवतमाळ, वाशीम आणि अकोला शहरात तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होता. भारतीय हवामान खात्याने एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. सरासरीपेक्षा तापमान अधिक राहण्याची शक्यता असल्याने यावर्षी विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसहुन अधिक असेल असा अंदाज आहे. दरम्यान, तापमानवाढीचा आलेख वर जात असताना येत्या शुक्रवारपासून चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. यावेळी तापमानात मात्र फारशी घट होण्याची शक्यता नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest