पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, महिला ताब्यात

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकदा पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री 9 वाजता या धमकीचा फोन आला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 28 Nov 2024
  • 02:14 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकदा पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री 9 वाजता या धमकीचा फोन आला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. धमकीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

फोन करणाऱ्याने पोलिसांना माहिती दिली की, पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट रचला आहे आणि त्यासाठी शस्त्रांची तयारी केली गेली आहे. पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेत त्वरित कार्यवाही सुरू केली. धमकी प्रकरणी आंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, तिने कोणतीही संशयास्पद माहिती दिली नाही. प्रारंभिक तपासानुसार, कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावात असलेल्या या महिलेने फोन केला असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या व्यक्तीने समाज माध्यमावर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात त्याने केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यावर मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest