तुळजाभवानीच्या सोने-चांदीचे मोजमाप

आई तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू झाली असून रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे मोजमाप केले जाणार आहे. देवीला अर्पण केलेल्या ऐवजाची १० वर्षांनंतर प्रथमच मोजणी होत आहे. तरीही अंदाजे २०० किलो सोने, ४ हजार किलो चांदी जमा झाल्याचे बोलले जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 08:26 am
तुळजाभवानीच्या सोने-चांदीचे मोजमाप

तुळजाभवानीच्या सोने-चांदीचे मोजमाप

दोनशे किलो सोने वितळवण्याच्या प्रक्रियेस सुरुवात

#तुळजापूर

आई तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू झाली असून रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या  वेळेत हे मोजमाप केले जाणार आहे. देवीला अर्पण केलेल्या ऐवजाची १० वर्षांनंतर प्रथमच मोजणी होत आहे. तरीही अंदाजे २०० किलो सोने, ४ हजार किलो चांदी जमा झाल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या ऐवजाची मोजमाप करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तुळजापूर मंदिरातील सोने वितळवण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. आरबीआयकडून सोने वितळून दिले जाणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात. दरवर्षी तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येतात. भक्तगण आपल्या पात्रतेप्रमाणे देवीच्या चरणी दान देतात. सोने, चांदी, रोख रक्कम, दागिने असे दान भक्तांकडून देण्यात येते.

१०५ पाकिटांतल्या सोन्याची मोजदाद

मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरू करण्यात आलंय. पहिल्या दिवशी एक पेटी मोजणीसाठी आणली गेली. या पेटीत ७२० पाकिटे होती. सगळीकडे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी एक पेटी मोजदादसाठी आणली गेली होती. पेटीत ७२० पाकिटे होती. त्यापैकी १०५ पाकिटांतल्या सोन्याची मोजणी करण्यात आली आहे. दैनंदिन देवीच्या पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या पंचवीस वस्तूंचे हस्तांतरण झाले. दुपारी प्रत्यक्ष एक पेटी आणून त्यातील सोने मोजणीस आरंभ झाला. सोने मोजणी प्रक्रिया ही व्हीडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत करण्यात येत आहे. सोने मोजणीसाठी शासकीय परवानाधारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते. ही प्रक्रिया पार पाडणाऱ्या मंडळींना खास वेश वापरण्यास दिला होता. या टी शर्ट, पँटला एकही खिसा नाही.

तिरुपतीच्या धर्तीवर हायटेक दर्शन व्यवस्था

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासाठी प्रसाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार होत आहे. यातून दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी शिर्डी, तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ वाचेल आणि गर्दीचंही नियंत्रण होईल. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शक्तीपीठाला विकासाची प्रतीक्षा आहे. अलीकडच्या काळात मंदिरात वाढलेली गर्दी आणि कमी पडत असलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest