संग्रहित छायाचित्र
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची आम्ही आयुष्यभर पाठराखण केली. पण कोठे घराण्याला काही मिळाले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी सात महिन्यांत मला आमदार केले आणि माझ्यावरील अन्याय दूर केला, अशा शब्दांत सोलापूर मध्य मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार देवेंद्र कोठे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
सात महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी विधानसभा निवडणुकीत यश खेचून आणले आहे. पत्रकारांशी बोलताना कोठे यांनी या यशाचे श्रेय फडणवीसांना दिले आहे. दरम्यान राज्याच्या सत्ता समीकरणात पक्षाच्या दोन्ही देशमुखांना मोठी भूमिका मिळू शकते. २०१४ च्या निवडणुकीत युतीची सत्ता आल्यावर दोघांत सुप्त भांडणे होती. त्यांच्याबद्दलच्या तक्रारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यापर्यंत गेल्या होत्या. महापालिकेतील कामाचा अनुभव असलेले देवेंद्र कोठे यांना फडणवीसांनी पक्षात आणले. हे तरुण शहरातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली तर त्याची सूत्रे देवेंद्र कोठे यांच्या हाती जातील. ते फडणीस यांचे लाडके ठरल्याने शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष होणार नाही.
लोकसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मोठे मताधिक्य मिळाल्याने भारतीय जनता पक्षाने सोलापूर शहर मध्यची जागा स्वतःकडे राखून ठेवली आणि युवा चेहरा म्हणून देवेंद्र कोठेंना उमेदवारी जाहीर केली. उत्तर शहर मतदारसंघातून विजयकुमार देशमुख लिंगायत समाजासह इतर समाजाच्या पाठिंबामुळे कोठे विजयी झाले आहेत. त्यांना एक लाख १७ हजार २१५ मध्ये मिळाली तर राष्ट्रवादीचे महेश कोठे यांना ६२ हजार ६३२ मते मिळाली आहेत. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. तर मध्य मतदारसंघातून त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे भाजपच्या तिकिटावर विजय झाले असून त्यांना एक लाख दहा हजार २७८ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात एमआयएम पक्षाचे फारूक शाब्दि पराभूत झाले. त्यांना ६१ हजार ४२८ मते मिळाली. यासोबतच येथे काँग्रेसचे चेतन नरोटे हे तीन नंबरला गेले. तर दक्षिणचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवून विजयी झाले. त्यांना एक लाख १६ हजार २३२ मते मिळाली तर त्यांच्याविरोधात उबाठाचे अमर पाटील पराभूत झाले. त्यांना ३९ हजार ८०५ मते मिळाली.