भाजपने मोडला स्वतःचा विक्रम; जास्त जागांसह मतदानाच्या टक्केवारीतही घसघशीत वाढ

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर २३३ जागांवर महायुतीने यश मिळवले आहे. तर १३२ जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शंभर जागांवर पूर्वीपेक्षा जास्त मतांची आघाडी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर २३३ जागांवर महायुतीने यश मिळवले आहे. तर १३२ जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला आहे. २६.७७ टक्के मते भाजपने मिळवली आहेत. १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मते मिळवत भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत. १०० जागांवर जास्तीत जास्त मते मिळवत भाजपने विक्रम प्रस्थापित केला आहे. भाजपने २०१४ ला १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ ला १०५ जागा जिंकल्या होत्या. आता भाजपने स्वपक्षाचा रेकॉर्ड मोडला आहे.

काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसने १०१ जागांवर निवडणूक लढली. यापैकी १६ जागांवर काँग्रेस विजयी झाली. यंदाच्या निवडणुकीत १२.४२ टक्के मते मिळाली. तर मतांची आकडेवारी पाहिली तर राज्यात काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर मते मिळाली. ८० लाख २० हजार ९२१ मते काँग्रेसला मिळाली.

शिवसेना शिंदे गटाने ८१ जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी ५७ जागा शिंदेगटाने जिंकल्या. १२.३८ टक्के मते शिवसेना शिंदे गटाला मिळाली. ७९ लाख ९६ हजार ९३० मते शिंदे गटाला मिळाली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला २० जागांवर विजय मिळवता आला आहे. ९९६ टक्के मते शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहेत. ६४ लाख ३३ हजार ०१३ इतकी एकूण मते शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अजित पवार गटापेक्षा जास्त मते  मिळाली. पण उमेदवार कमी निवडून आले आहेत. शरद पवार गटाने 86 जागांवर निवडणूक लढली आहे. ११.२८ टक्के मते शरद पवार गटाला मिळाली आहेत. ७२ लाख ८७ हजार ७९७ इतकी मते शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत मिळाली आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने ५९ जागा लढल्या यापैकी ४१ जागांवर अजित पवार गटाचा विजय झाला. ९.०१ टक्के मते अजित पवार गटाला मिळाली आहेत. ५८ लाख १६ हजार ५६६ इतकी एकूण मते अजित पवार गटाला मिळाली आहेत.

निवडणुकीच्या रिंगणाचत उतरेलल्या उमेदवारांपैसरी एकही व्यक्ती योग्य वाटत नसेल. तर नोटा हा एक पर्याय मतदारांसमोर असतो. नोटाला यावेळी ४ लाख ६१ हजार ८८६ मते मिळाली आहेत. याची टक्केवारी ०.७२ आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत ६६.०५ टक्के मतदान झाले आहे. तर २०१९ ला ६१.१ टक्के मतदान झाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest