Mumbai Expressway : द्रुतगती नव्हे कासवगती महामार्ग

पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास लवकर आणि व्यवस्थित व्हावा, यासाठी द्रुतगती महामार्ग अर्थात ‘एक्स्प्रेस वे’ तयार करण्यात आला. मात्र, हा द्रुतगती महामार्ग अनेकदा कासवगती महामार्ग ठरतो. याला कारण ठरते ते वाहतूक कोंडी. यावेळी शनिवार आणि रविवार (दि. २०, २१) असे सलग दोन दिवस या द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 22 May 2023
  • 03:42 pm
द्रुतगती नव्हे कासवगती महामार्ग

द्रुतगती नव्हे कासवगती महामार्ग

‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वर सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी, चार ते पाच किलोमीटरच्या रांगा

#पुणे

पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास लवकर आणि व्यवस्थित व्हावा, यासाठी द्रुतगती महामार्ग अर्थात ‘एक्स्प्रेस वे’ तयार करण्यात आला. मात्र, हा द्रुतगती महामार्ग अनेकदा कासवगती महामार्ग ठरतो. याला कारण ठरते ते वाहतूक कोंडी. यावेळी शनिवार आणि रविवार (दि. २०, २१) असे सलग दोन दिवस या द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला.

‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास तयार नाही. शनिवारी आणि रविवारी तर ही समस्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या तर जणू पाचवीला पुजलेली आहे. रविवारी (दि. २१) झालेल्या वाहतूक कोंडीमुळे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवासी तसेच वाहनचालक यांच्यात प्रचंड संतापाचे वातावरण होते. ‘‘एवढा मोठा रस्ता केवळ प्रवाशांनी टोल भरावा यासाठी बांधला आहे काय,’’ असा संतप्त सवाल ते करीत होते.    

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली. शनिवारी सकाळी मुंबईच्या बाजूला वाहतूक कोंडी ठप्प झाली होती. रविवारी पुन्हा वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. शनिवार आणि रविवारमुळे या एक्स्प्रेसवर वाढणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. एक्स्प्रेसचा मोठा टोल भरून प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळ या वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे.

मुंबईच्या बाजूला शनिवारी सकाळी ९.३० पासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत होत्या. नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप होत होता. शनिवारी आणि रविवारी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे महामार्ग पोलीस लक्षच देत नाही.

रविवारी तर या कोंडीत मोठी वाढ झाली. लोणावळा एक्झिटला वाहतूक कोंडीमुळे नागरिकांत प्रचंड नाराजी होती. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. सुट्ट्या संपवून आता नागरिक पुन्हा मुंबईकडे निघाले असल्याने लोणावळा एक्झिटजवळ वाहतूक कोंडी झाली. सकाळपासूनच ही रांग सुमारे चार ते पाच किलोमीटर इतकी लांब होती. त्यामुळे सुट्ट्या संपवून घरी जाणाऱ्या नागरिकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला.

वारंवार होते वाहतूक ठप्प

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत असते. बोरघाटात मागील आठवड्यात अपघात झाला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावर बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेनवर पलटला. त्यापूर्वी २७ एप्रिलला ट्रकचा असाच ब्रेकफेल झाल्यानेच विचित्र अपघात झाला होता. मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघाताच्या घटनाही घडतात. त्यापूर्वी एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली होती. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला होता.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest