हा कसला भाऊ, ओवाळणी खाऊ

”हा कसला भाऊ, हा तर ओवाळणी खाऊ” असे म्हणत महिला कार्यकर्त्यांनी महायुतीचे आमदार रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारले. ”राणा यांचे काय करायचे काय.. खाली डोके वर पाय” अशा घोषणा देत महिलांनी राणा यांचा प्रतीकात्मक पुतळ्याच्या गळ्यात नोटांची माळ घालून पिंपरीच्या मोरवाडी चौकात आंदोलन केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 14 Aug 2024
  • 07:16 pm

महिला कार्यकर्त्यांनी महायुतीचे आमदार रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारले

पिंपरीत शिवसेनेकडून (उबाठा) आमदार राणा यांच्या विरोधात आंदोलन

”हा कसला भाऊ, हा तर ओवाळणी खाऊ” असे म्हणत महिला कार्यकर्त्यांनी महायुतीचे आमदार रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारले. ”राणा यांचे काय करायचे काय.. खाली डोके वर पाय” अशा घोषणा देत महिलांनी राणा यांचा प्रतीकात्मक पुतळ्याच्या गळ्यात नोटांची माळ घालून पिंपरीच्या मोरवाडी चौकात आंदोलन केले. महायुतीत सहभागी असलेले अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीने आंदोलन केले.

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अमरावतीमध्ये नुकतेच एक वक्तव्य केले, ते म्हणाले होते की, विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद द्या अन्यथा तुमच्या खात्यातून दीड हजार रुपये पुन्हा काढून घेऊ. त्यांच्या या वक्तव्यानंतर राणा यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत पिंपरी येथे 'जोडे मारो' आंदोलन केले. राणा यांचे वक्तव्य महिलांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे आहे. रवी राणा यांच्याप्रमाणे महायुतीतील इतरही काही मंत्र्यांनी अशीच वक्तव्ये केली आहेत. योजना आणली म्हणजे महिलांवर उपकार केले का, असा सवालही यावेळी महिलांनी व्यक्त केला.

यावेळी आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका मीनल यादव, वैशाली मराठे, अनिता तुतारे , आशा भालेकर, सुजाता काटे, नजमा शेख , शशिकला उभे, ज्योती भालके , प्रज्ञा उतेकर, अश्विनी खंडेराव,  वैशाली कुलथे, कामिनी मिश्रा, रजनी वाघ, ज्योती भालके, वैशाली काटकर, सुजाता गायकवाड , साधना वाघमारे , वंदना बनसोडे, गीता कुषालकर, तस्लिम शेख, संगीता तुपके, जनाबाई गोरे, स्मिता मोगरे, कावेरी परदेशी आदी सहभागी झाल्या.

सुलभा उबाळे म्हणाल्या, अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरून संतापजनक विधान केले आहे. या विधानामुळे तमाम भगिनींचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद द्या अन्यथा तुमच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ, असे म्हणणारे राणा ही एक प्रवृत्ती आहे. खरे तर राणा यांच्या तोंडून भाजपची नीतिमत्ता समोर आली आहे. राणा यांनी आमच्या समस्त भगिनी वर्गाचा भर व्यासपीठावरून जाहीर अपमान केला आहे. राणा यांचे वक्तव्य अतिशय निंदनीय असून या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही आज राणासारख्या प्रवृत्तीला जोडे मारले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest