घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांनी स्वत:कडेही पाहावे
#चंद्रपूर
मी आणि माझे वडील विजय वडेट्टीवार दोघेही काँग्रेसच्या विचारधारेला बांधलेले आहोत. भाजपकडे चांगले नेते नाहीत, म्हणून ते विजय वडेट्टीवार किंवा इतर काँग्रेस नेते भाजपमध्ये येतील अशा अफवा पसरवत असतात, माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने स्वत:कडेही पाहावे, असा टोला शिवानी वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या मुलीला निवडणूक आखाड्यात उतरवले आहे. तिथे काँग्रेसकडून लोकसभेसाठी डझनभर नेते उत्सुक आहेत. मुलीला तिकीट दिल्याने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांवर घराणेशाहीचा आरोप होत आहे. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार आणि विजय वडेट्टीवारांना प्रत्येक ठिकाणी या आरोपाचे खंडन करावे लागणार आहे. याखेरीज पक्षातील ३५ ते ४० वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून मुलीला तिकीट दिल्याची किंमत वडेट्टीवारांना मोजावी लागेल, अशी चर्चा आहे. काँग्रेसकडून ५ तगडे नेते उमेदवारीसाठी उत्सुक असताना शिवानी वडेट्टीवारांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, चंद्रपूरमधून उमेदवारीसाठी माझ्यात आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात हेल्दी कॉम्पिटिशन सुरू आहे. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणा-या भाजपने स्वत:कडेही पाहावे. मुनगंटीवार मोठे नेते, चंद्रपुरात त्यांच्या विरोधात निवडणूक लढताना शिकायला मिळेल. विजय वडेट्टीवार आणि मी निष्ठावंत काँग्रेसी आहोत. अनेक वर्षे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. माझ्यासारख्या निष्ठेने काम करणाऱ्या या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. पक्ष जो निर्णय करेल त्याचे मी पालन करेल.
घराणेशाहीची जास्त उदाहरणे भाजपमध्ये
बेरोजगार तरुण, कंत्राटी कामगार, भूमिपुत्रांना रोजगार हे मुद्दे माझ्यासाठी महत्त्वाचे राहणार आहेत. चंद्रपूरमध्ये मी आणि प्रतिभा धानोरकर अशा दोन महिला दावेदार आहेत. हे ख-या अर्थाने महिला सबलीकरण आहे. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणा-या भाजपने स्वत:कडेही पाहावे. काँग्रेसपेक्षा घराणेशाहीची जास्त उदाहरणे भाजपमध्ये आहेत. भाजपने तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून वंचित ठेवले आहे.