दहावीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता १०वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात दहावीचा महाराष्ट्र राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे.
कोकण विभागाची टक्केवारी जास्त म्हणजे ९८.११ टक्के आहे. तर कोल्हापूर विभागाचा ९६.७३ टक्के, पुणे विभागाचा ९५.६४ टक्के, मुंबई विभागाचा ९३.६६ टक्के, औरंगाबाद विभागाचा ९३.२३ टक्के, अमरावती विभागाचा ९३.२२ टक्के, लातूर विभागाचा ९२.६७ टक्के, नाशिक विभागाचा ९२.२२ टक्के आणि नागपूर विभागाची टक्केवारी सर्वात कमी ९२.०५ टक्के आहे.
कुठे पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.