'राज्य सरकार निर्लज्ज, निर्दयी'
# मुंबई
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी अपघातांच्या मुद्द्यावरून सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
“प्रस्तावात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा उल्लेख आहे. त्या लोकांना आर्थिक मदत करावी आणि चूक करणाऱ्याला शिक्षा करावी असे म्हटले आहे. मदत व्हायलाच हवी. कार्यकर्त्यांसाठी तळमळणारा नेता अशा भावनेतून आम्ही एकनाथ शिंदेंकडे बघतो. पण त्यांच्यातही राजकारण किती भिनलंय याचं उदाहरण सांगतो”, असे म्हणत भास्कर जाधव यांनी एका गंभीर घटनेचा उल्लेख केला.
“गुहागर मतदारसंघातल्या एका जाधव कुटुंबातल्या माणसाच्या गाडीचा अपघात झाला. कंत्राटदारामुळे अपघात झाला. २०११ साली काम सुरू झाले, पण अजूनपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही म्हणून अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना विनंती केली की, एका कुटुंबातली १० माणसे मेली, त्यांना काहीतरी मदत करा. तेव्हा एकनाथ शिंदेंनी सांगितले की, भास्करराव, आम्ही मदत करतो, पण खासगी वाहनात त्यांचा अपघात झाल्यामुळे मदत होईल की नाही ते पाहावे लागेल”, असा दावा जाधव यांनी केला.