राममंदिर उद्ध्वस्त व्हावे हे मुस्लिमांचे मनसुबे; कालिचरण महाराज यांचं वादग्रस्त वक्तव्य
दोन दिवसांपूर्वी राममंदिर (Rammandir) उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे आहेत असं विधान पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना अयोध्याचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी केलं होतं.. त्यानंतर आता कालिपुत्र कालिचरण महाराज (kalicharan Maharaj) यांनी सुद्धा याबाबत मोठं विधान केलं आहे .राममंदिर उद्ध्वस्त व्हावे हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत, ते माध्यमांशी बोलत होते. 20 वर्षांनंतर जेव्हां आमची संख्या जास्त होईल तेंव्हा राममंदिर आम्ही पुन्हा फोडून टाकू..जी भीती महंतांनी व्यक्त केली ती खरी आहे.. अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांनी दिली आहे.
त्याचं बरोबर प्रियंक खर्गे यांनी सावकरांबाबत केलेल्या विधानाचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला, आम्हाला सावरकर पाहिजेत, ज्यांना नकोयत त्यांनी काढण्याचा प्रयत्न करा आम्ही लावण्याचा प्रयत्न करू. लोकांच्या डोक्यात आम्ही सावरकर टाकण्याचा प्रयत्न करू. अशी खोचक प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांनी दिली आहे. पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिरात महाआरतीसाठी आले असताना त्यांनी हे विधान केलं आहे.