दरड कोसळून अख्ख गाव उद्ध्वस्त, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत

इरसालवाडी वस्तीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 20 Jul 2023
  • 10:35 am
landslide : दरड कोसळून अख्ख गाव उद्ध्वस्त, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत

देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली

मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरसालवाडीवर दरड कोसळल्यने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत ७५ लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आले आहे. इरसालवाडी वस्तीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, "रायगडमधील इर्शाळवाडी आहे. या वाडीत जवळपास ४५ ते ४७ घरं आहेत. दरड कोसळल्यामुळे जवळपास १६ ते १७ घरं मलब्याखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. NDRF, TDRF आणि स्थानिक रेस्क्यू टीम काम करत आहेत."

देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इरसालगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

रायगड जिल्ह्यामधील इरसालवाडी वसाहत येथे ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसालवाडी (रायगड) येथे घडलेल्या दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी एपीआय काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे मदतीसाठी 8108195554 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे एक आदिवासी भागातील गाव. पुण्यातून ७५ ते ८० किमी अंतरावर डिंभे धरणाच्या परिसरात हे गाव वसललं होतं. त्यावेळी साधारण त्या गावाची लोकसंख्या ७५० च्या आसपास असावी. ३० जुलै २०१४ रोजी पहाटेच्या वेळी डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात ४४ हून अधिक घरं नागरिकांसह गाडली गेली. सहा दिवसात जवळपास १५१ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला घरातील व्यक्तीही जिवंत नव्हत्या. प्रशासनाचे त्यांचे अंत्यविधी केले होते. आता रायगडात पुन्हा त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest