अमरावतीत खासदार कार्यालयाचा ताबा कुलूप तोडून घेतल्याचा गुन्हा

जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष विनंती करूनही मिळत नसल्याने खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी कक्षाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेतले. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. कार्यालयाच्या मुद्द्यावरून यशोमती ठाकूर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर खासदार कार्यालय प्रशासनाने सील केले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 24 Jun 2024
  • 11:55 am

संग्रहित छायाचित्र

वानखेडे मागासवर्गीय असल्याने हीन वागणूक दिल्याचा आरोप

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष विनंती करूनही मिळत नसल्याने खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी कक्षाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेतले. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. कार्यालयाच्या मुद्द्यावरून यशोमती ठाकूर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर खासदार कार्यालय प्रशासनाने सील केले होते.

खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केल्याप्रकरणी खासदार वानखडे आणि आमदार ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावर काँग्रेसच्या नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केला आहे. आमचे खासदार मागासवर्गीय असल्याने त्यांना अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. यामागे खासदार अनिल बोंडे आणि रवी राणा असल्याचंही त्यांनी म्हटलं. यशोमती ठाकूर म्हणाल्या, ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर ५ जून रोजी नवनिर्वाचित खासदारांनी कार्यालयासंदर्भात प्रशासनाला एक पत्र दिलं. मात्र, त्यानंतर दिरंगाई करण्यात आली. खासदारांनी कालच्या बैठकीत पालकमंत्र्यांना विनंती केली. पालकमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी खालच्या दर्जाची वागणूक आम्हाला दिली. आमचे खासदार मागासवर्गीय आहेत. त्यामुळे अशी वागणूक देण्यात आली. यामागे खासदार अनिल बोंडे आणि रवी राणा आहेत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता गुन्हा का दाखल करण्यात आला?  खासदार त्या कार्यालयात बसू नये. काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी तेथे बसू नये, पण आम्ही घाबरत नाही. आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची सत्ता येईल. खूप काम करायचं आहे. मात्र, कामात अडथळे आणण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest