राज्यातील शिक्षक, पदवीधर निवडणूक पुढे ढकलली; शिक्षक संघटनांनी घेतला होता आक्षेप

राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर झालेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. १० जून रोजी ही निवडणूक होणार होती. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होणार होती.

संग्रहित छायाचित्र

राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर झालेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. १० जून रोजी ही निवडणूक होणार होती. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होणार होती. निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकलली आहे. 

दोन शिक्षक आणि दोन पदवीधर जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी १० जूनला मतदान होणार होते. परंतु काही शिक्षक आणि पदवीधर संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता. या काळात शाळांना सुट्टी असल्याने याचा मतदानावर परिणाम होईल असे शिक्षक संघटनांचं म्हणणे होते. याची दखल घेत निवडणूक आयोगाने घेतली आहे.   

विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे दोन शिक्षक आणि दोन पदवीधर जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी  १० जून रोजी मतदान होणार होते. तर १३ जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार होती.

चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार - 

१. मुंबई पदवीधर मतदारसंघ - विलास विनायक पोतनीस (ठाकरे गट)

२. कोकण पदवीधर मतदारसंघ - निरंजन वसंत डावखरे (भाजप)

३. नाशिक शिक्षक मतदारसंघ - किशोर भिकाजी दराडे (ठाकरे गट)

४. मुंबई शिक्षक मतदारसंघ - कपिल हरिश्चंद्र पाटील (लोकभारती)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest