Santosh Deshmukh | बीडच्या आरोपींचा 'तेरे नाम' मधील सलमान झाला पाहिजे, सरपंच परिषदेच्या धरणे आंदोलनातून धसांचा हल्लाबोल

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेच्या वतीने मुंबइतील आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Tue, 7 Jan 2025
  • 06:25 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेच्या वतीने मुंबइतील आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा आमदार सुरेश धस देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुख  देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी केली. 

आमदार सुरेश धस म्हणाले, एका दलित वॉचमनला मारहाण होत असताना सरपंच देशमुख त्याला वाचवायला गेले. खंडणी मागणाऱ्यांना त्यांनी विरोध केला. हा त्यांचा गुन्हा ठरला.त्यामुळे त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला. व्हिडिओ कॉल करून हा सगळा प्रकार दुसऱ्याला दाखवला. देशमुख यांनी विनवणी करूनही त्यांना सोडले नाही. या आरोपींना सांभाळणाऱ्या त्यांच्या आकांवर ३०२ अंतर्गत कारवाई होणार, असे धस म्हणाले. 

धस पुढे म्हणाले, ही केस ज्येष्ठ वकील  उज्ज्वल निकम यांना मिळावी यासाठी मी प्रयत्न करत आहे. आरोपींना गजाआड केले जावे. त्यांना त्यांच्या नातेवाईक तसेच मित्रमंडळींना भेटता येऊ नये अशा ठिकाणी त्यांना ठेवायला हवे. आरोपींची अवस्था तेरे नाम या चित्रपटातील सलमान खान खान सारखी व्हायला हवी. आरोपी वेड्यासारखे हिंडायला हवे. अशी त्यांची अवस्था करायची आहे. अशी टिका धस यांनी केली.

संतोष देशमुख राजकारणात पुढे जाऊ शकले असते. ते जिल्हा परिषद सदस्य देखील होऊ शकले असते. गावासाठी त्यांनी चांगले काम केले. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. देशमुख यांना विसरू नका. आजची आक्रमकता टिकवून ठेवा असे आवाहन धस यांनी उपस्थितांना केली. 

 सरपंच परिषदेच्या मागण्या: 

- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. 

- मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई व्हावी. 

- संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरी आणि ५० लाखांची मदत करण्यात यावी. 

- ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा आणल्यास सरपंच-उपसरपंच यांना ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी. 

- मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा.

Share this story

Latest