uddhav thackeray helicopter checking
दिल्ली विधानसभा निवडणुकांचं आज बिगुल वाजलं. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत दिल्ली निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली. दरम्यान, यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना कोपरखळी मारली. हेलिकॉप्टर चेक प्रकरणावर भाष्य करत चांगलेच सुनावले.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार काय म्हणाले...
गेल्या निवडणुकीमध्ये 'आमचं हेलिकॉप्टर चेक केलं. त्यांचे केल नाही.' असं म्हणत गोंधळ घातला. वाईट भाषा वापरली. आम्ही संयम ठेवला. पोलिंस ऑफिसरला धमकी देण्यापर्यंत लोकांची मजल गेली. स्टार कँपेनर आहेत, त्यांनी शिष्टाचार आणि सभ्यता पाळावी. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं तरी आम्ही कठोर कारवाई करु, त्यामुळं सगळ्यांचे समान चेकिंग होणार. अशा शब्दात आयुक्तांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंचे कान टोचले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
विधानसभा निवडणुकीदरम्यान, निवडणूक आयोगाने लागोपाठ दोन दिवस उद्धव ठाकरेंची बॅग आणि हेलिकॉप्टरमधील सामान चेक केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आणि बॅग चेक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही टीका केली होती.
तसेच, ‘महाराष्ट्र, झारखंड, त्याआधी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी आमचं सामान, हेलिकॉप्टर, प्रायव्हेट जेट, कारची तपासणी केली. ते आमच्या घरापर्यंत पोहोचले. तुम्ही निष्पक्षपणे काम करत असाल तर आम्हाला काहीही त्रास नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार ज्या ठिकाणी जात आहेत तिथे 25-25 कोटी रुपये पोहोचले आहेत. तुम्ही आमचं सामान चेक करा, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं हेलिकॉप्टर आणि त्यांची गाडी थांबवून तपासणी करता का?’असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला होता.