संग्रहित
मुंबईमध्ये अजब घटना घडली आहे. ज्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. घरामध्ये पैसे, मौल्यवान वस्तु काहीच मिळाल्या नाही, म्हणून त्यांने घरातल्याच महिलेला किस केलं. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
अनेकदा चोर घरात शिरल्यानंतर मौल्यवान वस्तु सापडल्या नाहीत तर वस्तुंची नासधुस करतात, घरातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी देतात किंवा त्यांची हत्या करतात. अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या वाचल्या असतील. पण मालाडमध्ये विचित्र घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
कुरार पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. ही अजब घटना मालाडमध्ये 3 जानेवारीला घडली. 38 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना घडली तेव्हा महिला घरी एकटीच होती. तेव्हा चोराने घरात प्रवेश केला आणि दरवाजा आतून बंद केला. चोराने महिलेला धाक दाखवत रोख रक्कम, मौल्यवान वस्तु देण्यास सांगितलं. पण महिलेने घरात मौल्यावन वस्तू नसल्याचे सांगितले. हे ऐकून यावेळी चोराने किस केलं आणि तिथून पळून गेला.
चोराच्या या अजब प्रकारानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली.