सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला धक्का; शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपविरोधात दंड थोपटले
सोलापूरमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबर हादरा बसला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी सोलापुरात महायुतीला तडे गेले आहेत. भाजपच्या राजकारणाला कंटाळून आणि शिवसेनेच्या नरमाईच्या भूमिकेमुळे अखेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, युवासेना प्रमुख उमेश गायकवाड यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. तसेच, हे सर्व सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष होता. वास्तविक शहर मध्यची जागा ही शिवसेनेला सुटणार हे जवळपास निश्चित झाले होते. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे ती जागा भाजपच्या वाट्याला आली. शिवसेनेचे चारही जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहर मध्यच्या जागेवरून तटस्थ होते. मात्र, पक्ष श्रेष्ठींकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराज होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर निकटवर्तीय मानले जाणारे समर्थक जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, उमेश गायकवाड शहरप्रमुख मनोज शेजवाळ यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र स्वराज पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती खा. संभाजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज पक्षात प्रवेश केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.