‘राजघराण्यातील राजकीय बळी देण्याचा स्वंयघोषित सम्राटाचा प्रयत्न’; मुश्रीफ यांची सतेज पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

मीच जिल्ह्याचा सम्राट अशा अविर्भावात वावरणाऱ्या एका राजकीय शक्तीने आपणावर लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढण्याची वेळ येऊ नये म्हणून राजघराण्यातील राजकीय बळी द्यायला मागेपुढे पाहिले नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Thu, 11 Apr 2024
  • 03:13 pm
Hasan Mushrif

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : मीच जिल्ह्याचा सम्राट अशा अविर्भावात वावरणाऱ्या एका राजकीय शक्तीने आपणावर लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढण्याची वेळ येऊ नये म्हणून राजघराण्यातील राजकीय बळी द्यायला मागेपुढे पाहिले नाही. अशा पडद्याआडून लढणाऱ्या स्वयंघोषित सम्राटांना मतदारच धडा शिकवतील आणि महायुतीच्या प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना विजयी करतील असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) येथे केले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना ही निवडणूक कोण्या एका व्यक्तिविरोधात नसून विचारांविरूद्ध असल्याचे आवर्जून स्पष्ट केले. 

या सेभेला परिसरातील मुश्रीफ-मंडलिक समर्थकांनी गर्दी केली होती. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘या निवडणुकीत कोणा व्यक्तीविरोधात आपली लढाई नसून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढाई आहे. शंभर वर्षांपूर्वी राजर्षींनी केलेले काम हे माझेच आहे, असे सांगण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. राजर्षी शाहू महाराज सर्वांचेच दैवत असून कोणा एकट्याचे नाहीत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे पुरोगामित्व आमच्या डीएनएमध्येच असून त्यांचे  विचार कृतीतून उतरवण्याचे काम मंडलिक घराण्याने केले आहे. काहीजणांचे डमी उमेदवार म्हणून शाहू महाराजांना निवडणूक लढवायला भाग पाडणाऱ्यांचा या निवडणुकीत निश्चितच पर्दाफाश होणार आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीची दृष्टी असणाऱ्या नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा विजय गरजेचा आहे.

महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविषयी जिल्ह्यात समाजाच्या सर्व थरात आदराचे स्थान असून त्यांच्यावर टीका करावयास कोणाकडे काहीही मुद्दा नाही.शाहू महाराज यांच्याविषयी कोणतेही विधान करताना फार काळजी बाळगावी लागते. त्यामळे विरोधी नेते शाहू महाराज यांच्याविषयी कोणतेही वक्तव्य करताना दिसत नाहीत. यामुळे महायुतीचे नेते काँग्रेसच्या अन्ये नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest