संग्रहित छायाचित्र
जालना: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष्मण हाके गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी हाके यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हाके यांची खालावलेली तब्येत पाहून वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले. विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी, हाके यांना तब्येतीची काळजी घ्यायला लावा. उद्या शिष्टमंडळ पाठवतो. त्यांच्यासोबत चर्चा करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवार यांना दिले.मागील ८ दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. आंदोलनाकडे माझे लक्ष होते. दोन दिवस आधी येणार होतो. कालही आणि आजही मुख्यमंत्र्यांशी बोललो. समाजासाठी आपण उपोषण केले. ओबीसीमध्ये जन्मलो म्हणून
ओबीसींच्या पाठीमागे राहणे माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. सत्ता, पदे येतात आणि जातात. पण कधी याचा विचार केला नाही. मी मंत्रिपद सोडून समाजासोबत राहिलो. ६५ टक्के आरक्षण गेले ते मान्य करता येत नाही. आहे तेवढे मान्य करावे लागेल असे कोर्ट म्हणते. फुले-शाहू-आंबेडकरांचे राज्य आहे पण २०१४ नंतर हे बदलले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचे जाईल का ही भीती निर्माण झाली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर केली.
‘उद्या शिष्टमंडळ येणार आहे. सगे-सोयरेंची मागणीबद्दल आयोगाची जबाबदारी आहे आणि हक्काचे संरक्षण होईल. सरकारमधील मंत्री म्हणाले की, सगेसोयरे टिकणार नाही. मग देत कशाला याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. मीडियाला विनंती करतो की, एकमेकांचे मित्र आज शत्रू होत आहेत. हे वातावरण का होतेय समजून घेतले पाहिजे. आता आंदोलन लवकरात लवकर संपवा नाही तर वातावरण बिघडेल आमचा गळा दाबून कुणी मारत असेल तर आम्हाला शांत बसता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही
अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय पहिल्या दिवसापासून उचलू. फ्लोरमध्ये सांगा आम्ही ओबीसीला धक्का लागू देणार नाही आणि लेखी स्वरूपातसुद्धा सांगावे. आपला लढा मोठा आहे. आपल्या नशिबात लढा आहे म्हणून यांना मी विनंती करतो. आम्हाला सुद्धा कधी कधी बुक्यांचा मार सहन करावा लागतो. कारण आपण एकत्र नाही आहोत. कुणाच्या बापाच्या कमाईवर आम्ही मिळाले असे नाही. आम्हाला आंबेडकर यांच्यामुळे मिळते. हक्कासाठी आवाज आणि एकत्रितपणे यावे लागेल. मला अभिमान वाटतो आणि वेदनासुद्धा आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता हे बसले त्याचे भाव आपण समजून घ्या. तुमचा त्याग ओबीसी समाज एकत्र आणेल, असे म्हणत वडेट्टीवार यांनी हाकेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. ‘बरोबर आहे मराठा आणि ओबीसी यांची ताटे वेगळी असायला हवीत संविधानाने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. सरकार हे दोन समाजाला झुंजवत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.