ST Bus : प्रवाशांच्या खिशाला कात्री, ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला

एसटी महामंडळाने ऐन दिवाळी हंगामात भाडेवाढ जाहीर केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरच होणाऱ्या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळातच एसटी च्या तिकीट दरात तब्बल १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 4 Nov 2023
  • 04:14 pm
ST Bus : प्रवाशांच्या खिशाला कात्री, ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला

प्रवाशांच्या खिशाला कात्री, ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला

एसटी महामंडळाने (ST Bus) ऐन दिवाळी हंगामात भाडेवाढ जाहीर केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरच होणाऱ्या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळातच एसटी च्या तिकीट दरात तब्बल १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. येत्या ८ नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. त्याचे दर कमी होते ना होते ते आता एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या तोंडावर भाड्यात १० टक्क्यांची वाढ केली आहे. ही दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ या सूत्रानुसार केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे.

७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत होणार लागू

एसटीकडून करण्यात आलेल्या या भाडे दराची अंमलबजावणी ही येणाऱ्या ७ तारखेपासून ते २७ तारखेपर्यंत लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे पाहिले तिकीट होते तेवढाच दर ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्या प्रवाश्यानी आधीच तिकीट बुक केले आहे. त्यास तिकिटाची राहिलेली रक्कम ज्यावेळी प्रवास होईल त्यावेळी वाहकाकडे भरावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे. यातच एसटी महामंडळ दिवाळीच्या मुहूर्तावर जास्तीच्या गाड्या सोडणार आहे. यांमध्ये गर्दी ही प्रचंड असल्यामुळे खाजगी बसेस याचा फायदा घेत जास्तीचे पैसे घेऊन लोकांच्या खिशाला कात्री लावतात ते वेगळेच. त्यामुळे नागरिकांची एन सणासुदीला चांगलीच कोंडी झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest