Santosh Deshmukh murder case: वाल्मिक कराड पोलिसांना शरण, पुणे सीआयडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी दाखल

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 31 Dec 2024
  • 12:18 pm
Beed,Walmik Karad,Sushma Andhare,Prajakta Mali,Sushma Andhare On Prajakta Mali,Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case,Devendra  Fadnavis,Santosh Deshmukh Murder Case,Santosh Deshmukh,MAHARASHTRA GOVERMENT,Dhananjay Munde,Pankaja  munde,वाल्मिक कराड, संतोश देशमुख हत्या प्रकरण, बीड, संतोष देशमुख, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार, पोलीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, अंजली दमानिया, सुषमा अंधारे, प्राजक्ता माळी

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. आत्तापर्यंत या प्रकणी 4 आरोपींना अटक करण्यात आले आहे. तर तीन आरोपी हे फरार होते. या तीघांमध्ये मास्टरमाईट वाल्मिक कराड हा एक होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, शरण येण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने देशमुख हत्याप्रकरणात मी दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी मी शिक्षा भोगायला तयार आहे असं म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हटलं आहे व्हिडीओमध्ये?

मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Share this story

Latest