Maharashtra: परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; CM देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत दिली माहिती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला असताना कर्नाटक दुसऱ्या, गुजरात तिसऱ्या, दिल्ली चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 12:06 pm
foreign Direct investment , Maharashtra, devendra fadnavis, थेट परकीय गुंतवणूक, महाराष्ट्र, देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

सत्ताधाऱ्यांवर नेहमी राज्यातील उद्योगधंदे परराज्यात जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. अशातच प्रबळ पुरावे अन् आकडेवारी सादर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 

सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच, परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला असताना कर्नाटक दुसऱ्या, गुजरात तिसऱ्या, दिल्ली चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.

फडणवीस ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र आता थांबणार नाही!

वार्षिक सरासरीच्या 95 टक्के

एफडीआय अवघ्या 6 महिन्यात...

पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.

आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे. 

मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो...

माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.

2020-21 : 1,19,734 कोटी

2021-22 : 1,14,964 कोटी

2022-23 : 1,18,422 कोटी

2023-24 : 1,25,101 कोटी

2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी

 

Share this story

Latest