BJP: महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या गोटात जोरदार हालचाली; पक्षाला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, कशी केली जाणार निवड?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या यशात मोलाचा वाटा असणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 03:23 pm
BJP,president,election,mahapalika election,MUMBAI,Ravindra chavan,Chandrashekhar Bawankule,Devendra  Fadnavis,भाजप, देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण, मुंबई, प्रदेशाध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महापालिका निवडणुकीचे वारं वाहू लागलं आहे. राज्यात अनेक पक्षानी आपली वेगळी भूमिका मांडली आहे तर काही पक्षांमध्ये मोठं बदल करण्यात येत आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपदेखील भाकरी फिरवणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपचा नवा चेहरा मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या यशात मोलाचा वाटा असणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात नवा भाजप प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. तसेच त्यासाठी विशेष निवडप्रक्रिया राबवली जाणार आहे. 

 

कशी असेल भाजपची निवड प्रक्रिया?

1 ते 20 जानेवारीपर्यंत भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवणार 

 

20 ते 28 जानेवारी दरम्यान तब्बल 5 लाख अॅक्टीव्ह सदस्य तयार करण्यात येतील. 

 

1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान 1 लाख बुथ प्रमुखांची निवड केली जाणार आहे.

 

भाजपकडून 10 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राज्यात 708 तालुका प्रमुखांची निवड केली जाणार आहे. 

 

भाजपच्यावतीने 20 ते 28 फेब्रुवारी दरम्यान 78 जिल्हा प्रमुखही निवडले जाणार आहेत. 

 

अखेर 15 मार्चपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असून भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.  

Share this story

Latest