संग्रहित छायाचित्र
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रीमंडळ बैठक पार पडली. यावेळी अनेक मोठं निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. यावेळी पुर्वीप्रमाणेच दर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेण्यात आले?
शासकीय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक खातं उघडण्यास मंजूरी
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा बँकेतून होणार
आकारी पड जमीनसंदर्भात तरतुदीत सुधारणा
महामंडळ सार्वजनिक उपक्रमातून अतिरिक्त गुंतवणुक निधी स मंजुरी
राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, राज्यातील तब्बल 963 शेतकऱ्यांना होणार फायदा
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला, मंत्री गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अतुल सावे, आशिष शेलार, नितेश राणे, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, भरत गोगवले, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे, गणेश नाईक, दादा भुसे, बाबासाहेब पाटील यांची ही बैठकीस उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 2, 2025
(दि. 2 जानेवारी 2025)
➡️ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)
➡️ शासकीय…
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे अध्यक्ष आहेत. या मोठ्या निर्णयानंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. निर्णयानंतर दरेकर यांनी शासनाचे आभार मानले. शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँकेला घेऊन व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल मी शासनाचं आभार व्यक्त करतो.