Maharashtra: भाजप अन् उद्धव ठाकरे गटात all is well? CM फडणवीसांच्या कौतुकानंतर उंचावल्या भुवया, काय आहे भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत.' अशा शब्दात सामना अग्रलेखातून फडणवीस यांचे कौतुक केल्यामुळं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नाही तर भाजप अन् उद्धव ठाकरे गटात ऑल इज वेल अशी चर्चा रंगली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 3 Jan 2025
  • 01:01 pm
Chandrashekhar Bawankule, BJP, Shiv Sena, Sanjay Raut, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा, शिवसेना, संजय राऊत, maharashtra politics news, BJP and Uddhav Thackeray group , saamana agralekh

maharashtra politics news

'बीडमध्ये बंदुकीचे राज्य काय असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत.' अशा शब्दात सामना अग्रलेखातून फडणवीस यांचे कौतुक केल्यामुळं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नाही तर भाजप अन् उद्धव ठाकरे गटात ऑल इज वेल अशी चर्चा रंगली आहे. 

नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. या दौऱ्यावेळी त्यांनी आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल, असे वक्तव्य केलं. तसेच,  वर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोलीमध्ये अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून आता ओळखला जाणार आहे. 

गडचिरोलीपासूनच महाराष्ट्राची सुरूवात होते. ‘स्टील सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू होत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

त्यांच्या या भुमिकेनंतर राज्यभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक होत आहे. अशातच सामना अग्रलेखात त्यांचे कौतुक करण्यात आलं आहे. तर भाजप नेत्यांसह स्वतः फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाचे आभार मानलं आहेत. राजकीय वर्तुळात हे बदलेलं वारं पाहता  राज्याचा राजकारणाला नवं वळणं मिळालं आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

'देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक का करू नये. गडचिरोलीसारखा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिथे ज्या प्रकारचे हत्याकांड असेल, पोलिसांचे बळी गेले, सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामुळे. हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर हे सुवर्णभूमी आहे. ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल. जमशेदपूरनंतर गडचिरोली हे पोलाद सिटी बनविले जात असेल आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाती काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे. 

फडणवीस यांच्यासमोर १० खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमोर पण केलं आणि त्यांनी संविधान हाती घेतलं. याचे प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक असला पाहिजे. मोदींनी जेव्हा चांगली काम केले तेव्हा आम्ही त्यांचे कौतुक केलं. गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल तर त्याचा जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे. या आधीच्या पालकमंत्र्यांचे काम आम्ही पाहिलं आहे. म्हणून मला विकासाचे काम महत्त्वाचे वाटले.

भाजप नेत्यांसह स्वतः फडणवीसांनी मानले आभार

माध्यमांनी फडणवीस यांनी सामानात केलेल्या कौतुकासंदर्भात विचारले असता, फडणवीस यांनी दोनचं शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. चांगल आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

आता सामनाच्या अग्रलेखावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना आभार मानले.  'आमच्याकडे आज आनंदाचा दिवस आहे. अनेक दिवसापासून आम्ही सामनातून चांगलं लिहिन्याची वाट पाहत होतो. यापूर्वीच त्यांना चांगले लिहिता आले असते. आज देवेंद्रजींना महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता गडचिरोली असतील. नक्षलवाद संपवण्याचे असेल.

किमान सामनातून देवेंद्र फडणीस यांचे कौतुक होणे हे आमच्यासाठी विकसित महाराष्ट्र घेऊन जात आहे याकरता आनंदाची गोष्ट आहे, "याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. तेव्हाही सामना कौतुक करेल याची प्रतिक्षा होती, पण ठिक आहे उशीरा केले यासाठी धन्यावाद, असंही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

Share this story

Latest