मुलांच्या किरकोळ भांडणातून अमळनेरमध्ये दंगल

लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यानंतर पाेलिसांवर हल्ला झाला. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून अमळनेरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 11 Jun 2023
  • 11:56 pm
मुलांच्या किरकोळ भांडणातून अमळनेरमध्ये दंगल

मुलांच्या किरकोळ भांडणातून अमळनेरमध्ये दंगल

संचारबंदी लागू, सहा पोलीस जखमी, दोन्ही गटांतील ६१ जणांवर गुन्हा

#अमळनेर (जि. जळगाव)

लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यानंतर पाेलिसांवर हल्ला झाला. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून अमळनेरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जमावाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. यात तीन पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांतील ६१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २९ जणांना अटक केली आहे. शहरात तीन दिवसांसाठी १४४ कलम अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पोलीस शांततेचे आवाहन करीत असताना एका गटाने धार्मिक घोषणाबाजी केली आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यात इरफान बेलदार याने राकेशसिंग परदेशीवर तलवारीने वार केला. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, चोपडा डीवायएसपी कृषिकेश रावळे यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी आराेपींची धरपकड करीत २९ जणांना ताब्यात घेतले असून एकूण ६१ जणांवर एपीआय परदेशी यांच्या फिर्यादीवरून जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल आणि  सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी कलम १४४ अन्वये तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest