‘विद्येचे माहेरघर’ पुणे आता बनतेय ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मध्ये काही मुले ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाष्य केलंय.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Mon, 24 Jun 2024
  • 06:15 pm
Jayant Patil

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मध्ये काही मुले ड्रग्ज  घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटलांनी भाष्य केलंय.

जयंत पाटील आपल्या समाजमाध्यमांवर पोस्ट करत म्हणाले की, "गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून  देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे." 

"अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत." 

"‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे." 

"मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest