पंकजा मुंडेंना बीआरएसनंतर एमआयएमचीदेखील ऑफर

गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये घुसमट होत असलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांना दोन वर्षांपूर्वीच आमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएममध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा दावा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. आताही आम्हाला त्यांना पक्षात घ्यायला आवडेल, असे म्हणत ओवेसी यांनी पंकजा यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 25 Jun 2023
  • 12:25 am
पंकजा मुंडेंना बीआरएसनंतर एमआयएमचीदेखील ऑफर

पंकजा मुंडेंना बीआरएसनंतर एमआयएमचीदेखील ऑफर

#मुंबई 

गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये घुसमट होत असलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांना दोन वर्षांपूर्वीच आमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएममध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा दावा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. आताही आम्हाला त्यांना पक्षात घ्यायला आवडेल, असे म्हणत ओवेसी यांनी पंकजा यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले आहे.

पंकजा मुंडे यांना बीआरएसमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे, तसेच त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर बीआरएसने दिली आहे, यावर प्रतिक्रिया देताना ओवेसी यांनी ही माहिती दिली. भाजप नेते नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या पक्षांतर करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपमध्ये नाराज असल्याबाबत पंकजा मुंडे यांनी स्वतःच जाहीर कार्यक्रमास सांगितले होते. त्यामुळे त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. त्यातच ‘‘पंकजा मुंडे या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत,’’ असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यानंतर बीआरएसच्या वतीने पंकजा यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर आता ओवेसी यांनीदेखील ‘‘आम्ही दोन वर्षांपूर्वीच त्यांना एमआयएम मध्ये येण्याची ऑफर दिली होती,’’ असा दावा केला आहे. या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती, असेदेखील ओवेसी यांनी नमूद केले.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘‘माझ्यानंतर पराभव झालेल्या अनेकांना आमदारकी, खासदारकी तर काहींना मंत्रिपदेदेखील मिळाली. कदाचित माझ्या ती पात्रता नव्हती का, असा प्रश्न मला पडला आहे,’’ असे पंकजा म्हणाल्या होत्या.   आपण ही खंत माझे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे व्यक्त करणार असल्याचेदेखील पंकजा यांनी सांगितले होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest