आता शाळेतच मिळणार एसटीचे पास, जाणून घ्या 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' मोहिमेबद्दल

पुणे : शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटी बसचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र

राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम आजपासून राबविण्यास सुरूवात

पुणे : शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटी बसचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) घेतला आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पाससाठी बसस्थानकात रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. या संदर्भात उद्यापासून (दि. 18) एसटी प्रशासनातर्फे 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

नविन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजने'अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्राकर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत.

पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक दिवस वाया जात होता. तसेच शाळा आणि महाविद्यालयात दांडी मारावी लागत होती. त्यामुळे शैक्षणिक नुकसानही होत होते. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा- महाविद्यालयांनी पुरविलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस. टी. पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

विद्यार्थ्यांना एस.टी.चे पास आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत दिवसभर उभे राहावे लागणार नाही. 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम दि.18 जूनपासून सर्व आगारांत राबवण्यात येणार आहे, असे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.

'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' आजपासून मोहीम

या संदर्भात उद्यापासून (दि. 18) एसटी प्रशासनातर्फे 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. (ST Bus Pass for Students)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest