आता शरद पवार, संजय राऊतांनाही धमकी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच दिग्गज राजकीय नेते शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते खासदार संजय राऊत तसेच त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनाही जिवानिशी मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्याच्या राजकारणातील धमक्यांचा ट्रेंड संपता संपत नसल्याचे दिसून आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 10 Jun 2023
  • 01:04 am
आता शरद पवार, संजय राऊतांनाही धमकी

आता शरद पवार, संजय राऊतांनाही धमकी

‘तुमचा दाभोलकर करू’ अशी पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ िपंपळकरची अनेक भाजप नेत्यांसोबत छायािचत्रे

#मुंबई 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच दिग्गज राजकीय नेते शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते खासदार संजय राऊत तसेच त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनाही जिवानिशी मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्याच्या राजकारणातील धमक्यांचा ट्रेंड संपता संपत नसल्याचे दिसून आले.

शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली. त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटून तक्रार दाखल केली.  ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या नावाच्या अकाउंटवरून शरद पवार यांना ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी देण्यात आली. सुप्रिया सुळे यांच्या तक्रारीची तत्काळ दाखल घेत राज्य शासन ॲक्शन मोडमध्ये आले असून पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून तत्काळ कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशा धमक्या खपवून घेणार नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. या धमकी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

संजय राऊत आणि सुनील राऊत या दोघांनाही अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा फोन कॉल आला असल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी पोलिसांना दिली. संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद करावा, त्यासाठी एक महिन्याचा वेळ देत असल्याचा इशारा फोनद्वारे देण्यात आला. हा धमकीवजा फोन सुनील राऊत यांच्या फोनवर आला असून संबंधित व्यक्ती हिंदी भाषेत बोलत असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये संबंधित व्यक्ती वारंवार सकाळी नऊचा भोंगा बंद करा, असा इशारा देत होती, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. अशा धमक्यांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.  

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरून आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे. त्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आाहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest