कितीही जनावरे एकत्र आली तरी वाघाची शिकार करू शकत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघ आहेत. कितीही जनावरे एकत्र आली तरी वाघाची शिकार करू शकत नाहीत, अशा तिखट शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. १८) देशभरातील भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 19 Jun 2023
  • 01:51 am
कितीही जनावरे एकत्र आली तरी वाघाची शिकार करू शकत नाही

कितीही जनावरे एकत्र आली तरी वाघाची शिकार करू शकत नाही

फडणवीस यांचा देशभरातील भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर हल्लाबोल

#नागपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघ आहेत. कितीही जनावरे एकत्र आली तरी वाघाची शिकार करू शकत नाहीत, अशा तिखट शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. १८)  देशभरातील भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

काँग्रेसमधून निलंबित झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आशिष देशमुखांची स्तुती करत फडणवीस यांनी भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर जहाल टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘माझे म्हणणे शब्दश: घेऊ नका. मात्र, ज्याप्रमाणे जंगलात कितीही जनावरे एकत्र आली तरी ते वाघाची शिकार करू शकत नाहीत. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना कुणीही पराभूत करू शकत नाही. नरेंद्र मोदी हे राजकारणातील वाघ आहेत. जनसामान्यांच्या हितासाठी ते अविरत काम करत असतात. ‘मन की बात’ च्या माध्यमातून देशातील कोट्यवधी जनतेशी ते थेट संवाद साधतात. जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे.

‘‘मुळात विरोधकांकडे कोणताही चेहरा नाही. नेतृत्व कुणी करावे, यावरून त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस नाराज झाली आहे. आपण काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. इतर राज्यांतही तशीच स्थिती आहे. ते एकमेकांनाच पाडण्याची तयारी करत आहेत,’’ असे फडणवीस यांनी नमूद केले.

आमचे सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे सरकार तुम्ही पाहिले आहे. ते केवळ घरीच बसणारे होते. स्वत: शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात आमचे सरकार येताच आपण शेतकरी, महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, असा दावादेखील फडणवीस यांनी केला आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest