NEET UG दोन शिफ्टमध्ये 11 ऑगस्टला होणार !

National Testing Agency (NTA) ने NEET PG 2024 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. NTA नुसार ही परीक्षा 11 ऑगस्ट रोजी आयोजित केली जाईल.

NEET UG

संग्रहित छायाचित्र

National Testing Agency (NTA) ने NEET PG 2024 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. NTA नुसार ही परीक्षा 11 ऑगस्ट रोजी आयोजित केली जाईल. दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार असल्याचेही सांगण्यात आले. NTA ने SOP आणि प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. 

जे विद्यार्थी 23 जून रोजी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET PG मध्ये बसणार होते ते NBE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नवीन तारीख तपासू शकतात. या NEET PG परीक्षेशी संबंधित अधिक माहिती विद्यार्थ्यांना लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल. नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, त्याचा कटऑफ १५ ऑगस्टपर्यंत जारी केला जाईल.

अधिकृत सुचनेत दिलेल्या माहितीनुसार, '22.06.2024 च्या NBEMS च्या सूचनेच्या अनुषंगाने, NEET PG 2024 परीक्षेचे आयोजन पुन्हा शेड्यूल करण्यात आले आहे. NEET PG 2024 आता 11 ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. नोटीसमध्ये पुढे असे लिहिले आहे की, NEET PG 2024 मध्ये बसण्यासाठी पात्रतेची कट-ऑफ तारीख 15 ऑगस्ट राहील.

अध्यक्षांनी दिली माहिती

NEET PG ची परिक्षा पूर्वी 23 जून रोजी होणार होती, परंतु NEET UG पेपर लीकच्या वादामुळे, परीक्षेच्या तारखेच्या (23 जून) 12 तास आधी 22 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले. 

एनबीईएमएसचे अध्यक्ष अभिजात सेठ म्हणाले होते की, एनईईटी पीजी परीक्षेच्या अखंडतेवर कधीही शंका नसली तरी गेल्या ७ वर्षांत आम्ही ही परीक्षा आतापर्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे.

नुकतीच घडलेली घटना पाहता परीक्षेचे पावित्र्य आणि अखंडता राखली जावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही आवश्यक SOPs आणि प्रोटोकॉलचे पुनरावलोकन केल्यानंतर NEET PG ची नवीन तारीख जाहीर करू.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest