महाराष्ट्र : राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले - नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, गृहमंत्री कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Congress State President, Nana Patole, law and order situation, Maharashtra, Home Minister, Devendra Fadnavis, failing to manage, resign

File Photo

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत. यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (दि. ३) केली.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर घटनेतील आरोपी व शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अजून अटक का झाली नाही? ते पाकिस्तानात पळून गेले का? पुण्यातही एका माजी नगरसेवकाची गोळ्या घालून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. हे सर्व लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निलंबित करावे, असेही पटोले म्हणाले.

पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी महायुती सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘‘बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर १५ दिवस अत्याचार सुरु होते, हे उघड झाले आहे, शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही गायब आहे. बदलापूर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची मुंबईत बदली करुन एकप्रकारे बक्षिसच दिले आहे. ही शाळा भाजप आरएसएसशी संबंधित असल्याने शाळा संचालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे त्यात योगदान दिसत आहे.’’

पटोले यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा उल्लेख केला. ‘‘राज्यातील शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटात सापडला आहे. मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे, शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अजून पंचनामे झाले नाहीत, मदत पोहचणे तर दुरची गोष्ट आहे. मागील पावसाळ्यात झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही. पण भाजपा युती सरकार मात्र जनतेच्या पैशावर इव्हेंटबाजी करून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहेत. सणासुदीच्या दिवसात शेतकरी व जनतेला वाऱ्यावर सोडून सरकारी तिजोरी लुटली जात आहे,’’ असा आरोपही त्यांनी केला.

शेतकरी संकटात असताना केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सोयाबीनला फक्त ३००० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे आणि १३ लाख मेट्रिक टन सोयाबीनशी संबंधित उत्पादनांची आयात केली आहे. केंद्रातील भाजप सरकार मोठ्या प्रमाणात आयात करून खास मित्राला फायदा करून देत आहे आणि शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे, ही आयात थाबंवली पाहिजे. सरकारने सोयाबीनला ७ हजार रुपये भाव जाहीर करावा तसेच धानाला ३ हजाराचा भाव जाहीर करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली असून त्या संदर्भात आपण पंतप्रधानांना आपण पत्र लिहिले आहे असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest