संग्रहित छायाचित्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
मीराबाई पटोले यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीराबाई पटोले यांच्यावर आज दुपारी २ वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी ता. साकोली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक
— Anil Patil Chimegaonkar (@AnilVyewhareINC) December 29, 2024
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री #मीराबाई_फाल्गुनराव_पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली @NANA_PATOLE @INCMaharashtra pic.twitter.com/ffDkWF4NYt