शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नाईक यांची प्राणज्योत मालवली. नाईक हे शरद पावर यांचे विश्वासू मानले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नाईक यांचे हैदराबाद येथ पहाटे पाच वाजताच्या सुमारास निधन झाले. नाईक हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यंदा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.
प्रदीप नाईक यांची राजकीय कारकिर्द
प्रदीप नाईक हे १९९९ ला राजकारणात सक्रिय झाले आणि त्यानंतर १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी पहिली किनवट विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर स ठेवत प्रथम २००४ साली किनवट - माहूर विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले. त्यानंतर सण २० २०१४ व २०१४ ते २०१९ या काळात सलग तीन वेळा किनवट विधानसभा निवडणुकीत विजय विजयाची हॅट्रिक साधली होती. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत प्रदीप नाईक यांचा पराभव झाला.
प्रदीप नाईक यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवर उद्या म्हणजेच 2 जानेवारीला सकाळी 11 वाजता मूळ गावी दहेली तांडा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.