Maharashtra Politics
राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. नुकतचं नविन वर्षाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी विठुरायचे दर्शन घेत काका पुतण्या एकत्र येण्याच साकडं घातलं. त्यांच्या या प्रार्थनेमुळं राज्यातील राजकारणाला लवकरच नवं वळण लागणार असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर आशा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्री विठ्ठल रुक्मिणीकडे सर्वांना सुखी ठेव असं साकडं घातलं. तसेच यावेळी त्यांनी पवार कुटुंबात आलेल्या दुराव्यावरही भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाल्या आशा पवार?
माध्यमांशी बोलताना आशा पवार म्हणाल्या, 'पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली. सगळं वाद संपू दे असं पांडुरंगाला सांगितलं असल्याचे आशा पवार यावेळी म्हणाल्या. तसेच माध्यमांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे का? असा सवाल केला असता, त्यांनी होय असं उत्तर दिलं. पुढे तुमचं पांडुरंग ऐकणार अस विचारलं असता आशा पवार यांनी हात जोडत होय होय ऐकणार असं सांगितलं.
आशा पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंब एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या वाढदिनाला अजित पवार सह कुटुंबासह तसेच त्यांचे काही जवळचे नेते शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष पोहचले होते. अजित पवार यांच्या या भूमिकेनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.